अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- लग्न व इतर समारंभ करताय तर पोलीसांची परवानगी घ्या नाही तर जेलची हवा खावी लागेल.राहुरीच्या तहसिलदारांनी राहूरी तालुक्यातील ग्रामपंचायत व नगर पालिका क्षेत्रात लग्न सभारंभ अथवा इतर कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश आज दिनांक 14 जून रोजी राहूरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी पारीत केला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉगडाऊन शिथिल करण्यात आले असे तरी प्रशासनाकडून काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.तरीही ग्रामपंचायत व नगर पालिका हद्दीत विवाह सभारंभ होत आहेत.जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त व्यक्ती लग्नसभारंभास उपस्थित राहत आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लग्न सभारंभात नियमानुसार पोलीस ठाण्याची परवानगी असेल तरच लग्नांना परवानगी द्यावी.परवानगी नसल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा सन 2005 मधील तरतुदी नुसार कारवाई करावी असे तहसीलदार शेख यांनी आदेशात म्हंटले आहे.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात परवानगी देण्यात आलेल्या लग्न सभारंभास नियमानुसार योग्य तो पोलीस बंदोबस्त द्यावा तसेच विना परवाना लग्न सभारंभ होणार नाही,याबाबत गावातील पोलीस पाटील यांना खबरदारी घ्यावी तशा सूचना द्याव्यात असेही तहसीलदार शेख यांनी आदेशात म्हंटले आहे.
दरम्यान राहूरी तालुक्यातील कणगर येथे गेल्या ५ ते ६ दिवसांपूर्वी एका वस्तीवर विवाह सभारंभ संपन्न झाला असता नवरदेवासह जवळपास ३० पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना बाधीत निघाले असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून या विवाह सभारंभा नंतर तहसिलदार यांनी परवानगी बंधकारक केली आहे.
विना परवाना लग्न व इतर समारंभ होत आसल्याचे समजल्या नंतर पोलीसांनी तात्काळ समारंभाच्या ठिकाणी जावून संबधित लग्न समारंभातील नवरदेव, नवरी सह दोघांचे पालक यांच्या विरुद्ध गुन्हा करावा.
ग्रामपंचायत व नगर पालिका हद्दीतील नागरिकांनी लग्न व इतर समारंभ करण्यापुर्वी परवागी घ्यावी आन्यथा जेलची हवा खावी लागणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम