Gold Price Today : गेल्या महिन्यात संपन्न झालेल्या दिवाळीत सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली होती. खरंतर यावर्षी प्रथमच सोने एक लाखाच्या पार गेले. चांदीची किंमतही दीड लाखाच्या वर गेली. दरम्यान दिवाळीनंतर काही दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण पाहायला मिळाली होती.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना हे मौल्यवान धातू खरेदी करताना मोठा दिलासा मिळणार अशी आशा होती. खरे तर काल तुळशी विवाह संपन्न झालाय. तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नाचा सिझन सुरू होतो. यामुळे सोन्या चांदीच्या किमतीत झालेली कपात सर्वसामान्यांसाठी दिलासाची ठरणार होती.

पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली असून यामुळे पुन्हा एकदा सोने खरेदी करू इच्छिणारे ग्राहक चिंतेत आले आहेत.
लग्नसराईच्या सुरुवातीलाच या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली असल्याने येत्या काळात याच्या किमती आणखी वाढतील की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान आता आपण तीन नोव्हेंबर 2025 रोजी 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत कशी आहे याबाबतचा आढावा घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
दहा दिवसांपूर्वी अर्थातच 25 ऑक्टोबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 25 हजार 620 रुपये प्रति तोळा एवढी होती. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 15 हजार 150 रुपये प्रति तोळा होती. दरम्यान काल 2 नोव्हेंबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 23 हजार रुपये होती.
तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 12 हजार 275 रुपये नमूद करण्यात आली. पण आज तीन नोव्हेंबर 2025 ला पुन्हा एकदा किमतीत वाढ झाली आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 380 रुपये प्रति तोळा, 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 12 हजार 900 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 23 हजार 170 रुपये नमूद करण्यात आली.
तसेच नाशिक, वसई विरार, भिवंडी, लातूर या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 410 रुपये प्रति तोळा, 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 12 हजार 930 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 23 हजार 200 रुपये नमूद करण्यात आली.
चांदीची किंमत कशी आहे ?
दहा दिवसांपूर्वी अर्थात 25 ऑक्टोबरला एक किलो चांदीची किंमत एक लाख 55 हजार रुपये होती. 31 ऑक्टोबरला हीच किंमत एक लाख 51 हजार रुपये नमूद करण्यात आली. काल एक किलो चांदीची किंमत एक लाख 52 हजार रुपये होती. पण आज तीन नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा चांदीच्या किमतीत किलोमागे दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच आज प्रति किलो चांदीची किंमत एक लाख 54 हजार रुपये झाली आहे.













