खुशखबर : लहान मुलांसाठी कोरोना लस ‘ह्या’ महिन्यात येणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- भारतात लहान मुलांसाठीची कोरोना लस ऑगस्टपर्यंत येऊ शकते. यानंतर काही दिवसांतच देशात मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. सूत्रांच्या हवाल्याने मंगळवारी हे वृत्त आले.

सांगितले जाते की, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत ही माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते.

तज्ज्ञांनुसार, मुलांसाठीची लस कोरोनाला नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल. यानंतर शाळाही उघडल्या जाऊ शकतात. देशात तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले होते.

दुसरीकडे, देशता झायडस-कॅडिलाने आपल्या झायकोव्ह-डी लसीचे १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील चाचण्या पूर्ण केलेल्या आहेत. आपत्कालीन वापरासाठी त्यांनी डीसीजीआयकडे अर्जही केलेला आहे. तसेच भारत बायोटेकही त्यांच्या कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवर चाचण्या घेत आहे.

त्याचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येऊ शकतात. अमेरिकने जगात सर्वात आधी यंदा मे मध्ये १२-१५ वयाेगटातील मुलांवर फायझर-बायोनटेकच्या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती. युरोपीयन युनियनने गेल्या शुक्रवारीच मॉडर्नाच्या लसीच्या १२-१७ वयोगटावरील वापरास मंजुरी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe