EPS Pension : खाजगी किंवा सरकारी नोकरी करत असताना अनेकांच्या पगारातील काही रक्कम कापली जाते. तसेच जे नोकरदार आहेत त्यांना माहिती असते ही रक्कम कशासाठी आणि का कापली जाते? मात्र या कापलेल्या रकमेचा कर्मचाऱ्यांनाच फायदा होत असतो.
नोकरी करत असताना EPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती असते की निवृत्तीनंतर आपण पेन्शन घेण्यासाठी पात्र आहोत. अनेकांना EPS आणि EPFO म्हणजे माहिती नसते. मात्र त्यांच्या पगारातून रक्कम वजा केली जाते. यातील २० वर्षापेक्षा अधिक दिवस ज्यांची रक्कम कापली गेली आहे त्यांना देखील EPFO कडून बोनस मिळू शकतो.

हा बोनस पेन्शन योजनेअंतर्गत नमूद केल्यानुसार अतिरिक्त सेवा वर्षांच्या स्वरूपात दिला जातो. एकदा हा बोनस तुमच्या सेवा वर्षांमध्ये जोडला गेला की, तुम्ही प्राप्त करण्यास पात्र असलेल्या पेन्शनच्या रकमेमध्ये वाढ होते.
जर एखाद्या कर्मचाऱ्याने EPF योजनेअंतर्गत 20 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा केली असेल, तर सेवा कालावधीत दोन वर्षे जोडली जातात. हा सेवा कालावधी एका नियोक्त्यासोबत किंवा वेगवेगळ्या नियोक्त्यांसोबत असू शकतो. परंतु ते ईपीएफ योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. लक्षात घ्या की EPS अंतर्गत कमाल सेवा कालावधी 35 वर्षे आहे.
EPS पेन्शन रकमेत बोनस कसा दिला जातो.
जे कर्मचारी EPS साठी पात्र आहेत त्यांना पेन्शन दिली जाते. तसेच यामध्ये बोनस देखील जोडला जातो. EPFO कडून पेन्शनपात्र वेतन X पेन्शनयोग्य सेवा वर्षे याची गणना करून ते दिले जाते.
उदाहरणात पहिले तर, जिथे एका कर्मचाऱ्याने EPF आणि EPS खात्यांमध्ये सतत योगदान देत 21 वर्षे अनेक नियोक्त्यांसोबत काम केले आहे. ईपीएफ कायद्यानुसार, पेन्शनपात्र वेतनाची कमाल मर्यादा 15,000 रुपये आहे.
पात्र पेन्शन रक्कम रु. 4,500 – (15,000X21)/70. आता, बोनस सेवा वर्षे (2 वर्षे) पेन्शनपात्र सेवा वर्षांमध्ये जोडल्यास, पेन्शनची रक्कम रु.4,929 – (15,000X23) / रु.70 होईल. बोनस सेवा वर्षांच्या जोडीने पेन्शनच्या रकमेत रु.429 ने वाढ झाली आहे.