अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चार पटीने वाढली आहे. त्यामुळे हीच संख्या तिसऱ्या लाटेत अधिक होणार आहे. जिल्ह्यात तिसरी लाट थोपवायची असेल तर सर्वांनी काळजी घ्यावी.
कर्जत आणि जामखेड तालुक्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा १४ ऑगस्ट रोजी जामखेड तालुका दौरा आयोजित करण्यात आला होता.

या दौऱ्याची सुरुवात खर्डा येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या भूमिपूजनाने झाली. यानंतर दुपारी जामखेड येथील आरोळे हाॅस्पिटल येथे कॅथॉलिक लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लॅन्ट व ऑक्सिजन बेड लोकार्पण सोहळा व शेवटी कर्जत जामखेडमधील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीबाबत जामखेड येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनाली बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे, उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, तिसरी लाट सुरू झाली आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. सध्या रूण बरे होण्याचे प्रमाण ९७% आहे. उद्यापासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल झाले असले तरी पुढील दोन महिने सर्वांनी काळजी घ्यावी,
असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, कोविड रुग्णांची मोफत सेवा केल्याने कार्यक्रमात आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी आरोळे व त्यांच्या भगिणी शोभा आरोळे यांना पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम