लसीकरणाच्या मागणीसाठी गुरुजी सरसावले; तहसीलदारांना दिले निवेदन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातच जिल्ह्यात दरदिवशी भयावह आकडेवारी समोर येत आहे.

यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहीम हि युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. यातच आता फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांनी लसीकरणाची मागणी केली आहे. कोरोना संकटकाळात तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गेल्या

वर्षभरापासून फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत असून, सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचे आहे.

त्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र कॅम्प लावावा, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड व प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत अतिशय वेगाने वाढत असल्याने दररोज नियमितपणे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान शेवगाव तालुक्यात ७०८ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत.

सध्या स्थानिक पातळीवर माझे कुटुंब माझी जवाबदारी कुटुंब सर्वेक्षण कामी तसेच काही शिक्षकांना कोविड केअर सेंटर व चेकपोस्टवर कर्तव्य बजाविण्याचे आदेश तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिले आहेत.

काम करताना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास निश्‍चित फायदा होईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe