अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते इच्छाशक्तीच्या बळावर भाळवणी येथे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरु केले.
सुमारे ८२०० रुग्णांना व्यवस्थित बरे करून घरी पाठवले असून एकही रुग्ण आजपर्यंत दगावला नाही. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनीमहाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमात पारनेरचे आमदार निलेश लंके बोलत होते.
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनीमहाराज जयंती आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. पुष्पवृष्टी करत लंके यांचे स्वागत करण्यात आले. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तृप्ती कान्होरे या तरुणीने रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव राहुल झावरे,सत्यम निमसे,विनोद औटी,गणेश भापकर,सामाजिक कार्यकर्ते गणेश धात्रक यांसह माजी उपसरपंच सुरेश कान्होरे,नंदकुमार कान्होरे,चैतन्य कहाणे,गोकुळ कहाणे,श्रीधर कहाणे, दिलीप हांडे,
अविनाश भोर,दत्ता ढमढेरे,अक्षय कान्होरे,सोमनाथ ढमढेरे,महेश पानसरे,बंटी कहाणे ,वेदांत कहाणे,अमोल थोरात यांसह ग्रामस्थ व तरुणांची उपस्थिती होती.
पुढे लंके म्हणाले, आपण नैसर्गिक पद्धतीने काही कोरोना रुग्ण हे बरे केले असून शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराला दिल्ली येथील विश्वरूप रॉय चौधरी यांनीही भेट दिली. देशात माझ्या इतका कोरोना रुग्णांशी संबंध कुणाचा आला नसेल. अनेक कोरोना रुग्ण भीतीपोटी मृत्युमुखी पडले.
आम्ही रुग्णांना आधार देऊन त्यांची भीती घालविण्याचे काम केले. रुग्णांच्या मंनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात, तर सकाळी योगा देखील घेतला जातो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम