अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील बांधावरील गवत पेटवून दिले होते. त्यामुळे हे गवत तर जाळले
पण त्यासोबत शेजारच्या शेतकऱ्याचा तब्बल अडीच एकर ऊस जाळून खाक झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील निमगाव डाकु येथील शेतकरी श्रीरंग पांडूरंग रासकर यांचा सर्वे नं २६१ मध्ये अडीच एकर खोडवा ऊस होता.
शेजारील शेतकऱ्याने गवताचा बांध पेटवला. ऐन दुपारच्या वेळी बांध पेटवल्यामुळे उन्हाची तीव्रता व आगीची दाहकता यामुळे ही आग अत्यंत वेगाने पसरली. त्यात रासकर यांचा सर्व ठिबक सिंचन संच जळुन गेले.
उसाला आग लागताच बांध पेटवणार मात्र तेथून निघून गेला. शेजारील शेतकरी मारुती केशव जाधव, व त्यांचा मुलगा योगेश जाधव यांनी आग विझवण्यास मदत केली. मात्र तोपर्यंत रासकर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|