तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून वाळूचा ट्रॅक्टर पळविला

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कर्जत येथील महसूल विभागाच्या पथकाने घुमरी येथील सीना नदीच्यापात्रात अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडले.

मात्र या कारवाईत तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला. याबाबत अधिक माहिती अशी कि,

अवैध वाळू उपसा कारवाई केलेले दोन्ही ट्रॅक्टर कर्जत येथे आणत असताना ट्रॅक्टर चालक सचिन अनभुले याने आपल्या मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीला फोन करून बोलावून घेतले.

यावेळी चालक सचिन अनभुले याने तलाठी धुळाजी केसकर यांना शिवीगाळ करत ट्रॅक्टरमधून ढकलून दिले.

त्या इसमाने तलाठी केसकर यांना पकडुन ठेवत त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह आष्टी तालुक्याच्या हद्दीत पळवून नेला.

याप्रकरणी घुमरी येथील सचिन महादेव अनभुले तसेच पळून गेलेल्या एकाविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी धुळाजी केसकर यांनी ही फिर्याद दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe