आरोग्य अधिकारी बोरगे यांची मनपा आयुक्तांच्या कारवाईवर पलटवार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- बर्थडे पार्टी… तसेच कोरोना काळातील निराशाजनक कामगिरी मुळे वादाचे केंद्रबिंदू बनलेले मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

मात्र कोविड काळात आपल्याला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पडल्या आहे. तसेच मला सक्तीच्या रजेवर जाण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत बोरगे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना पत्र देवुन पलटवार केला आहे.

आयुक्त गोरे यांनी काल डॉ. बोरगे यांच्या सक्तीच्या रजेचा आदेश काढला होता. त्यांचा अतिरिक्त पदभार डॉ.सतीश राजूरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. बोरगे यांनी आयुक्त गोरे यांच्या आदेशावर आज सकाळी सविस्तर म्हणणे मांडले आहे.

डॉ. बोरगे यांनी यात म्हटले आहे, उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत यांना स्वतंत्र अधिकार प्रदान केलेे आहेेत.

त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांची कामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आहे व त्या कर्तव्यामध्ये मला कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी पूर्ण न केलेल्या बाबींसाठी मला जबाबदार धरणे योग्य ठरत नाही. माझ्यावर ज्या काही जबाबदार्‍या देण्यात आलेल्या होत्या त्या मी पूर्ण केल्या आहेत.

मला माझी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. तसेेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून नेमलेल्या इतर अधिकार्‍यांच्या नेमणुकीचे आदेश रद्द करावेे, असे पत्रात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe