अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- मनसुख हिरेन खून प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला.
तब्बल नऊ वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारप्रकरणातून त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. थेट विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंविषयी आक्षेप घेतला आहे! स्फोटकांनी भरलेल्या कारजवळ सर्वात आधी सचिन वाझे पोहोचले होते.
तसेच, मयत मनसुखलाल हिरेन देखील सचिन वाझेंच्या संपर्कात होते. हे एवढे योगायोग कसे असू शकतात? असा आक्षेप फडणवीसांनी घेतला आहे. हिरने यांची हत्याच झाली आहे.
यामध्ये सचिन वाझे यांचा हात असल्याचं दिसतंय. मात्र सचिन वाझेंना वाचवण्यासाठी ठाकरे सरकार एडी-चोटी एक करत आहेत, पूर्ण ताकद लावत आहेत.
सचिन वाझे नेमकी कोणाकोणाची नावं घेतो याच्या भीतीने ठाकरे सरकार वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सचिन वाझे हे API आहेत. त्यांना वाचवण्यासाठी इतका फोर्स का लावताय? सचिन वाझे हे सभागृहापेक्षा मोठे आहेत का? विरोधी पक्षनेत्याला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हा घाबरणारा विरोधी पक्षनेता नाही,
असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जी इनोव्हा गाडी होती, ती मुंबईतच आहे, त्या गाडीची माहिती मिळाल्यास, मी माधमांसमोर घेऊन येईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वाझे यांना अटक केली तर अनेक नावे बाहेर येऊ शकतात :- सचिन वाझे आणि हिरेन या दोघांत कसे संबंध होते आणि वाझे हेच कसे हिरेन यांच्यासोबत मृत्यूच्या आधी सोबत होते, हे फडणवीस यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख हे वाझे यांना का आणि कशासाठी वाचवत आहेत, असा सवाल त्यांनी केला. सचिन वाझे यांना अटक केली तर अनेक नावे बाहेर येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|