अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- भारतदुसऱ्यांदा तसेच तिसऱ्यांदा एकाच व्यक्तीला कोरोनाची लागण होत ते लोक पुन्हा पाॅझिटिव्ह आढळून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लस घेतल्यानंतरही यापूर्वीच काही जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे.
एका दिवसभरात आढळून आलेल्या ३६ रुग्णांपैकी ९ रूग्णांना दुसऱ्यांदा बाधा झाल्याचे समोर आले. मागील पाच दिवसांत दुसऱ्यांदा तसेच तिसऱ्यांदा पाॅझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या २१ झाली आहे.
दुसरी लाट संपली की तिसरी लाट सुरू झाली, हा प्रश्न निरुत्तर असला तरी वारंवार विचारला जात आहे. शहरात जुलैमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने कमी होऊन दिवसभरात सरासरी दहा ते पंधरा रूग्ण आढळून येत होते. पण रूग्ण संख्या सरासरी २० ते २५ पर्यंत वाढली तर सोमवारी दिवसभरात नवे ३६ रूग्ण आढळून आले आहे.
माहितीनुसार नव्याने आढळून येत असलेल्या रुग्णांमध्ये दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पाॅझिटिव्ह येणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. मनपाकडे टेस्टिंग केलेले नगर व भिंगारमधील सुमारे ९ जण सोमवारी दुसऱ्यांदा पाॅझिटिव्ह आहे. तर केडगाव भागातील १५ जण दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पाॅझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा होणार नाही, या भ्रमात असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही जण दोन डोस घेतल्यानंतरही पाॅझिटिव्ह आल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अमंलबजावणी होणे आवश्यक आहे.त्यामुळे आता कोरोना रोखण्याचे नवे आव्हान प्रत्येकावर आहे. लसीकरणासह मास्कचा वापर अन् गर्दी टाळणे याच प्रभावी उपायांशिवाय पर्याय नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम