अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- घरासमोर उभे असलेल्या पती पत्नीवर आरोपी अशोक गुलाब आढाव याने हत्याराने वार करून जखमी केले. दरम्यान ही धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत देवराम मिखाईल आढाव (रा. मानोरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी अशोक गुलाब आढावा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, देवराम आढाव व त्यांची पत्नी सुमन, सून दिपाली तसेच नात अक्षदा हे सर्वजण त्यांच्या राहात्या घरासमोर असताना तेथे अशोक आढाव हा दारु पिऊन त्या ठिकाणी आला व फिर्यादी देवराम आढाव व त्यांची पत्नी सुमन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला.
यावेळी त्याने हत्याराने फिर्यादी देवराम आढाव यांच्या पोटावर व त्यांची पत्नी सुमन यांच्या कंबरेवर वार करून जखमी केले. दमदाटी करून निघून गेला.
देवराम आढाव यांनी तात्काळ राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक आढाव याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम