‘मला’ फक्त विकासाचे राजकारण करायचे आहे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो त्यात कधी बदल होत नसतो.आता इथले राजकारण बदलेल आणि विकासाच्या राजकारणाकडे सर्वांचा कल राहील.

लोकांच्या हितासाठी जातीय राजकारण नाही तर फक्त विकासाच राजकारण करायचय असे मत आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले.

कर्जत तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. आ.रोहित पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी पानंद रस्ते मोहीम हाती घेण्यात आली असुन कर्जतचे ९५ तर जामखेडचे १०० पानंदरस्ते होत आहेत.

बुडीत बंधाऱ्याचा जिव्हाळ्याचा विषयही मार्गी लागणार असून, भीमा पात्रात सुमारे ४२ कि.मी पर्यंत बॅकवॉटरचा फुगवटा कायम राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये.

उपकार्यकारी अभियंता अशोक घुले म्हणाले, दिनदयाल उपाध्याय योजनेत हे काम प्रस्तावित झाले होते, मात्र गेली तीन वर्षांपासून हे काम अर्धवट अवस्थेत पडुन होते मात्र आ. रोहित पवारांनी पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले आहे.

रविंद पांडुळे म्हणाले, वीज आणि रस्ते या दोन्ही गरजा पुर्ण झाल्या असून शेतकरी हितासाठी हाती घेण्यात आलेल्या बुडीत बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला तर दुष्काळाची झळ पोहोचणार नाही. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe