अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-आता संवेदनशील राज्यातून दूर पल्ल्याच्या गाड्यांनी जिल्हयात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकातच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपासणी सुरू झाली आहे.
शुक्रवारी पहिल्याच दिवशी १७ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. या सर्वाचे अहवाल निगेटीव्ह आले असून, त्या सर्वांना होम क्वारंटाईनमध्ये राहाण्याचे सक्त निर्देश दिल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची बाधा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली. या परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मात्र, रोज वाढणाऱ्या बाधितांच्या आकड्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले.
दरम्यान राज्य शासनाने नव्याने जारी केलेल्या निर्देशानुसार गुरुवारी अन्य राज्यातून रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेश जारी केले.
डेप्यूटी डीईओ जितेंद्र पाटील यांचेकडे जबाबदारी सोपवली आहे. कोरानासंदर्भात संवेदनशील असलेल्या केरळ, गोवा, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड या राज्यातून रेल्वेने जिल्ह्यात उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू झाली आहे.
दर बुधवारी धावणारी अहमदाबाद- बेंगलूर, दररोज धावणाऱ्या दिल्ली- बेंगलूर, मडगाव- निजामुद्दीन (येणारी -जाणारी) आणि पुणे- जम्मूतावी या पाच एक्सप्रेस गाडयातील प्रवाशांची नगर, बेलापूर व कोपरगाव स्थानकावर स्क्रिनींग तपासणी होत आहे.
ज्या प्रवाशाकडे आरटीपीसीआर रिपोर्ट नसेल त्यांची रॅपीड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. काल पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे तपासणी सुरू झाली.
जिल्ह्यातील अहमदनगर स्थानकावर १२, कोपरगाव स्थानकावर ४ आणि बेलापूर येथे एक अशा एकूण १७ प्रवाशांची सायंकाळपर्यंत तपासणी करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
निर्देशानुसार रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास संबंधीतास कोविड केअर सेंटर मध्ये दाखल केले जाणार असल्याचे नोडल अधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|