अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- पारनेर तालुक्यात टाळेबंदीत सुरु असलेले अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयात दिले.
पारनेर तालुक्यातील अवैध दारू विक्री बाबत अनेक वेळा पत्रव्यवहार व तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. टाळेबंदीत सर्व व्यवसाय बंद असून,
प्रशासनाच्या आशीर्वादाने पारनेर शहरात सर्रास अवैध दारू व्यवसाय सुरु आहे. दारु विक्री सर्रास सुरु असताना सर्व व्यवसायांना परवानगी द्यावी अन्यथा दारु विक्री पुर्णत: बंद करण्यात यावी.
दारु विक्रीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दारुड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. तर चढ्या भावाने दारु विक्री होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अवैध दारू व्यवसाय जोमात सुरु असताना अर्थपूर्ण संबंधामुळे प्रशासन प्रशासन कारवाई करत नसून एकप्रकारे त्यांना अभय देत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. टाळेबंदीत सुरु असलेले अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम