अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रूपाने, डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढविली आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. हा विषाणू फुफ्फुसांच्या पेशींच्या रिसेप्टरला अधिक घट्टपणे चिपकून राहण्यास सक्षम आहे.
ज्यामुळे फुफ्फुसांना लवकर प्रभाव होण्याची शक्यता आहे. दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळून आले असून, जुलै महिन्यात या रुग्णांचे नमुने पुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाला.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी केली. जुलै महिन्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाने काही जणांचे जनुकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. नमुन्यांचा अहवाल आरोग्य विभागाला आता प्राप्त झाला आहे.
त्यामुळे आढळून आलेली डेल्टा प्लसचे चार रुग्ण जुनेच आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दोन, श्रीगोंदे १ व पाथर्डी १ असे ४ डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले. १६, १७, २० आणि २१ जुलैला जिल्हा रुग्णालयाने हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते.
या रुग्णांचे अहवाल आता प्रशासनाला प्राप्त झाले असले तरी ते रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. नमुन्यांचा अहवाल महिन्याभरानंतर प्राप्त विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे दोन घटकांवर अवलंबून असतात, पहिल्या घटकात रिप्लिकेशनची गती, संसर्गाचे प्रमाण, संक्रमणाची पद्धत आणि बरेच काही समाविष्ट आहे.
दुसऱ्या घटकामध्ये लिंग, वय, आरोग्य, व्यायाम, औषधे आणि तणाव यांचा समावेश आहे. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट विषाणूच्या लक्षणांबद्दल बोलतो, तेव्हा सर्वात सामान्य लक्षण शोधण्यासाठी संक्रमित व्यक्तीकडून डेटा गोळा केला जातो. डेल्टा व्हेरिएंट हा मूळ परिवर्तनाचा बदललेला प्रकार आहे.
या उत्परिवर्तनादरम्यान लक्षणेही बदलली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोबाईल अॅपद्वारे युकेच्या सेल्फ-रिपोर्टिंग सिस्टमनुसार, कोविड -19 चे सर्वात सामान्य लक्षण मूळ लक्षणांच्या तुलनेत बदलले जाऊ शकते. डेल्टा व्हेरिएंटची लक्षणे कोणती? खोकला, घसा खवखवणे, ताप आणि डोकेदुखी ही कोविड-19 ची ही सामान्य लक्षणे आहेत.
तसेच सतत नाक वाहत राहणे, या लक्षणाचा सामान्य लक्षणांमध्ये समावेश नाही. कारण हे लक्षण सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. कोरोना आणि सध्या चिंता वाढवत असलेल्या डेल्टा व्हेरिएन्टची लक्षणे काय आहेत, त्यामध्ये नेमका फरक काय आहे हे आपल्याला जाणून घेणे सध्या खूप गरजेचे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम