अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-हजारो कोवीड रूग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या जामखेड येथील आरोळे कोविड सेंटर येथे ऑक्सिजन बेड क्षमता वाढविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यानी व्यापारी वर्गाला विनंती केली.
या विनंतीस मान देत व्यापारी वर्गाने अवघ्या १ तासात २ लाख १० हजार रुपयांपेक्षा पेक्षा जास्त रक्कम जमा झाली. यामुळे अनेक कोरोना रूग्णांचा जीव वाचेल. आज देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
यात कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णाला रूग्णालयात दाखल केल्यानंतर अत्यंत महागडे उपचार घ्यावे लागतात. परिणामी रूग्णालयाचे बिल काही लाखांत येते. मात्र हे बील सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने
अनेक दानशुर नागरिकांनी पुढे येत कोवीड सेंटर सुरू केले आहेत. ज्यात रुग्णांवर अत्यल्प खर्चात किंवा मोफत उपचार केले जातात. त्यामुळे सध्या असे कोविड सेंटर हे सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत.
मात्र रुग्ण वाढत असल्याने या सेंटरचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. मग तो भागवण्यासाठी समाजातील अनेकांची मदत घेतली जाते. कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या जामखेड येथील आरोळे कोविड सेंटरला रूग्ण वाढल्यामुळे ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे होते.
यासाठी जामखेडमधील प्रशासनाने व्यापारी वर्गाला आर्थिक मदतीचे आवाहन केले या आवाहनाला प्रतीसाद देत एका तासात तब्बल दोन लाख दहा हजार रुपये जमा केले. या सामाजिक दातृत्वाबद्दल व्यापारी व अधिकाऱ्यांचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|