शाळेत घुसून शिक्षकास मारहाण नगर तालुक्यातील घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डी.जी. महारनवर व कोरके यांना गावातील विकास खाकाळ यांनी मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

तरी शिक्षकांना मारहाण करणाऱ्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई अशी मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व इतर शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांना देण्यात आले. याबाबत सविस्तर असे की, मंगळवार दि.२३फेब्रुवारी रोजी सकाळी रुईछत्तीसी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डी.जी. महारनवर व कोरके यांना

गावातील विकास खाकाळ यांनी मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुपारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविला.

तर शिक्षकांना मारहाण करर्णा­या आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News