अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या जमिनीच्या उतार्यावर खासगी व्यक्तीचे नाव लावून ते हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कुकाणा येथील जंगल रामभाऊ चाकणे यांची 1 हेक्टर 14 आर जमीन मुळा पाटबंधारे विभागाच्या मुळा धरणाच्या कार्यालयीन कामकाजासाठी 1967 मध्ये खरेदी करण्यात आली होती.
या जमिनीवर 1975 ते 80 च्या दरम्यान मुळा पाटबंधारे कार्यालय व कर्मचार्यांना राहण्यासाठी निवासस्थाने बांधण्यात आले आहेत. सध्या या ठिकाणी कार्यालय व निवासस्थाने आहेत.
मुळा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात जमीन असताना परस्पर जमीन नावावर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ राजेंद्र चाबुकस्वार, शिवाजी म्हस्के व इतरांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
त्यात काही खासगी व्यक्तींनी महसूल अधिकारी, कर्मचारी हाताशी धरून हे कृत्य केले आहे. त्यात स्थळ निरीक्षण न करता आणि सत्य परिस्थिती न पाहता कोणत्या न्यायालयाचा वारसा दाखल न करता वारसा नोंद मुदतीच्या आत मंजूर केली आहे.
अधिकार्यांनी मिळून हा प्रकार केला असल्याचा आरोप ही निवेदनात करण्यात आला. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हा प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर मुळा पाटबंधारे विभागाला जाग आली. या विभागाच्या अधिकार्यांनी जागेची नोंदी व इतर प्रक्रिया थांबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नेवासा तहसीलदार यांना ही पत्र दिले आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|