नगर तालुक्यातील ‘या’ गावात आजपासून जनता कर्फ्यू!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- सध्या राज्यासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रचंड वेगाने प्रादुर्भाव होत आहे. तो रोखण्यासाठी  नगर तालुक्यातील जेऊर येथे सोमवार दि.३ ते मंगळवार दि.११ मे पर्यंत ग्रामस्तरीय समितीच्यावतीने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.

जेऊर गावामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कहर केला आहे. आजतागायत जेऊर मध्ये सुमारे ५०० च्यावर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्या देखील मोठी आहे.

तसेच दररोज कोरोना बाधितरुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी ग्रामस्तरीय समितीने गावामध्ये जनता कर्फ्यू पुकारला आहे.

जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांनी सर्व आदेशाचे पालन करण्याचे आवाहन कोरोना ग्रामस्तरीय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News