अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पत्रकार गणेश चंद्रसेन विघे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हे बिबट्याच्या हल्ल्याततून बालंबाल बचावले असून देवळाली शहराच्या जवळील बिबट्याच्या संचाराने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता गणेश हे देवळाली प्रवरा इथून राहुरी फॅक्टरी येथे मधल्या मार्गाने जात असताना सुखदेवराव मुसमाडे यांच्या वस्तीजवळ यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पत्रकार गणेश विघे हे अचानक आलेल्या मोबाईल फोनवर बोलत होते. त्यावेळी दुचाकीचा स्पीड कमी झाला असल्याने त्या संधीचा फायदा घेत बिबट्याने यांच्या दुचाकी वर झेप घेतली.
दरम्यान मोबाईल कॉल संपल्या त्यामुळे विघे यांनी गाडीचा स्पीड वाढविला असता बिबट्याची झेप चुकून त्याचा पंजा दुचाकीच्या मागील सीटवर ओरखडला गेला.
पंजाचा आवाज झाल्याने विघे यांनी मागे बघितले असता त्यांची पाचावर धारण बसली काय झाले , आणि कसे झाले याचा त्यांना थांग पत्ता लागला नाही.
मात्र दमदार शैलीत कंबरेएवढ्या उंचीचा बिबट्या रस्ता ओलांडून उतरताना दिसल्यावर विघे यांनी देवाचे आभार मानले.
याच वेळी त्या ठिकाणाच्या वरच्या बाजूला येथील चंगेडिया कुटुंबातील दोन मुली फोन आला म्हणून थांबल्या असता
त्या दोघी तेथून जवळ असलेले शंकर पलाले या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षिदार ठरल्या याबाबत गणेश विघे यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली असून त्या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम