अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अमरावती शहर येथून अपहरण केलेल्या ४ वर्षाच्या मुलाची अहमदनगर येथून सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
दरम्यान पोलिसांनी या अपहरणकर्त्याला जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 17 फेब्रुवारी रोजी मोनीका लुणिया, (रा. अमरावती) ह्यांचा नातू नयन, वय- ४ वर्षे यांस फिरायला घेवून बाहेर गेल्या असता एका मोटार सायकलवरुन आलेल्या एक अनोळखी महिला व अनोळखी पुरुष यांनी मुलगा नयन यांस पळवून नेले होते.
त्याबाबत महेन्द्र श्रीरामजी वाटणकर, (वय- ४६ वर्षे, रा. भुतेश्वर चोक. अमरावती) यांनी राजापेठ पो.स्टे. अमरावती शहर येथे फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अपहरणकत्यांबाबत मिळालेल्या माहितीवरुन मा. पोलीस आयुक्त सो. अमरावती शहर यांनी मा. पोलीस अधीक्षक सो,
अहमदनगर यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देवून अमरावती शहर पोलीसांचे पथक तपासकामी अहमदनगर येथे पाठविले. सदरचे पथक अहमदनगर येथे दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी नमुद गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलाचा व अपहरणकत्यांचा शोध घेणेसाठी स्वतंत्र पथक नेमण्याबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचो तीन वेगवेगळी पथके नेमून अपहरण झालेल्या मुलाचा ब अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या. पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर बातमी मिळाली कि , सदरचा गुन्हा हिना शेख , रा.फलटण चौकी,
अल्मश शेख, रा. कोटला व मुसाहिब शेख, रा. मुकुंदनगर अशांनी मिळून केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेतला. या आरोपींमध्ये हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे, (वय -२५ वर्षे, रा. फलटण चौकीजवळ, कोठला , अहमदनगर) ,
अल्मस ताहीर शेख, (वय- १८ वर्षे, रा . कोठला, अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख, (वय- २१ वर्षे , रा . मुकुंदनगर , अहमदनगर) यांना अहमदनगर शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले . त्यांचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून सदर अपहरण केलेला मुलगा असिफ शेख व फैरोज शेख यांचे ताब्यामध्ये आहे,
अशी माहिती दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर आरोपींचा नगर शहर व परिसरामध्ये शोध घेत असताना सदर अपहरणकर्ते हे मुलास घेवून अहमदनगर येथून कल्याण रोडने कल्याणचे दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली .
त्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन अपहरणकर्ते हे एका मोटार सायकल वरुन अपहरण झालेल्या मुलास घेवून कल्याणचे दिशेने जात असताना त्यांचा पाठलाग करुन त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपहरण केलेल्या मुलासह ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते ४) आसिफ हिनायत शेख,
वय- २४ वर्षे, रा. कोठला, अहमदनगर, ५ ) फैरोज रशिद शेख, वय- २५ वर्ष, रा. कोठला, अहमदनगर अशी असल्याचे सांगीतले. वरील नमुद पाच आरोपी व अपहरण झालेला मुलगा नामे नयन मुकेश लुणिया , वय- ४ वर्षे , रा . अमरावती यांना पुढील कारवाई कामी राजापेठ पो.स्टे . अमरावती शहर येथील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे .
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved