अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाच्या लढ्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र एकीकडे हे सगळं असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकणार कसे ? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
करोनाला आवर घालण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे करोना लस. मात्र ही लस नगर शहरात संपली असून आजही लसीचे नवे डोस आले नाहीत. परिणामी उद्या रविवारीही लसीकरण बंद राहिल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
करोनाचा संसर्ग वाढत असल्याने नगरकरांनी करोना लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. लस घेतल्याने करोनापासून संरक्षण होते, या भावनेतून नगरकरांची लस घेण्यासाठी ओढ निर्माण झाली आहे. मात्र आता लसच संपल्याने हे केंद्रही ओस पडली आहेत.
केंद्राबाहेर लस संपल्याचे बोर्ड झळकत आहेत. पहिला डोस घेतलेल्यांची दुसर्या डोसची मुदतही संपली आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नगरकर केंद्राकडे धाव घेतात, मात्र तेथील बंदचा बोर्ड पाहून माघारी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यांच्याकडे नाही.
आज उशिरापर्यत नव्याने लस आली नाही. त्यामुळे उद्या रविवारीही लसीकरण बंदच राहणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम