अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनावर मात करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या लसींचा राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात तुटवडा झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा आरोग्य विभागाकडून २८ जानेवारीपासून लस देण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. फेब्रुवारी २०२१ पासून राहुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती.
राहुरी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात लसीची मागणी करण्यात आली. मात्र, मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा झाला.
पहिल्या टप्प्यात लस टोचून घेतलेल्या नागरिकांना २८ दिवसानंतर पुन्हा लस देण्याचे धोरण आरोग्य विभागाने जाहीर केले होते.
मात्र, शासनाच्या आदेशानुसार ४५ दिवसांनी लस दिली जात असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील लस उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.
मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा नसल्याने बहुतांशी नागरीकांना माघारी जावे लागले. राहुरी ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस कधी उपलब्ध होणार हा सवाल नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|