अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- राहुरी शहरात गावठी हातभट्टी दारू अड्यावर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकले असून १ लाख ७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या कारवाईने राहुरी तालुक्यातील अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शहरातील राजवाडा परिसरात भाऊसाहेब विठ्ठल साळवे,अरूण शामराव साळवे हे आपल्या फायद्याकरीता स्वतःच्या रहात्या घराच्या आडोशाला भट्टीवर गावठी हातभट्टी दारू तयार करताना व विक्री करताना दिसून आल्याने सदर संयुक्त पथकाने हे छापे टाकुन दारू अड्डे उध्वस्त केले आहेत.
यामधे गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, गावठी हातभट्टी दारूचे ड्रम,नवसागर असा एकुण १ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर आरोपी भाऊसाहेब विठ्ठल साळवे, अरूण शामराव साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रनजित जाधव,बाळासाहेब मुळीक,दत्ताञय हिंगडे,संजय दरंदले, राहुल सोळुंके,शिवाजी ढाकणे,चंद्रकांत कुसळकर,अजिनाथ पाखरे,सचिन ताजने,बनसोडे आदिंच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम