अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील बहुरुपी यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याचे विदारक चित्र लॉकडाऊनमुळे बहुरुपीयांच्या पालावर दिसून येत आहे.
जेऊर येथे नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातुन सुमारे १३ कुटुंब उपजिवेकेसाठी जेऊर येथे वास्तव्यास आले आहेत. बहुरूपी हे गावोगावी तसेच आठवडे बाजारांनी भटकंती करत असतात. नकला करुन मिळणाऱ्या मोबदल्यात आपली व कुटुंबियांची उपजिविका भागवत असत.

परंतु कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉक डाऊन तसेच बंद करण्यात आलेले आठवडे बाजार यामुळे बहुरुपी यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथे बहुरुपी यांचे १३ कुटुंब वास्तव्यास असुन सुमारे ६० सदस्य आहेत.
कर्त्या पुरुषांबरोबर चिमुकल्यांची जगण्यासाठी धडपड सुरू असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
मागिल वर्षी लॉकडाऊन मध्ये याच कुटुंबियांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, तहसिल याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य व किराण्याची मोठी मदत केली होती. परंतु तीच परिस्थिती आज बहुरुपीयांच्या पालावर उद्भवली असुन सर्व कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













