अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. करोना काळात सर्वसामान्यांना घराबाहेरही पडून न देणारे प्रशासन नदीपात्रात वाळूउपसा करण्यास परवानगी कशी देऊ शकतात असा सवाल उपस्थित होत आहे.
तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळू तस्करांवर कारवाई होत जिल्ह्यात या तस्करांनी उच्छाद मांडला आहे. पण प्रशासनच कारवाई करणार नसल्याने हे अवैध धंदे चालक आपला व्यवसाय व्यवस्थितरित्या सुरु ठेवत आहे.
दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातीत मातुलठाण येथेे गोदावरी नदीपात्रातील चार हजार ब्रास वाळूचा लिलाव नाशिक जिल्हातील एका ठेकेदारानी घेतला आहे. 16 फेब्रुवारीला प्रत्यक्ष लिलावचा जागेवर ताबा देण्यात आला होता.
संबधीत ठेकेदार लिलावाचे नियमबाह्य वाळू उपसा व यंत्र सामुग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने तसेच करोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संबधीत लिलाव बंद केला होता.
नदीपात्रात ग्रामपंचायत हदीत बंद झालेला वाळूउपसा लिलावधारकाने कडक लॉकडाऊन व संचारबंदी, जमावबंदी, 144 कलम लागू असतानाही पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे गावात करोनाचा फैलाव होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राज्यात ऐवढे कडक लॉकडाऊन असताना या लिलावाला परवानगी कशी मिळाली ? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा राहिला आहे. तरी स्थानिक प्रशासनाने त्वरित लिलाव बंद करावा, अशी मागणी गावातीत ग्रामस्थ करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम