दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, सात जणांवर गुन्हा दाखल !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-फळे पिकवण्यासाठी लागणारा एसी आणण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील पती व सासु – सासऱ्यासह एकुण सात जणांवर विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, जामखेड माहेर असलेली फिर्यादी विवाहित महिला नाजमीन जावेद बागवान, वय २९ वर्ष ही लग्न झाल्यानंतर आपल्या नगर येथील माळीवाडा येथील पंचपीर चावडी भागात सासरी नांदत होती.

मात्र पती जावेद मोहम्मद हुसेन बागवान, सासु रशिदा महंमद हुसेन, सासरे महंमद हुसेन हसंन बागवान, नणंद नाजिया पिरमहमद, भाया साजिद महमद हुसेन बागवान,

जाव रुकैय्या साजिद बागवान व दीर-समीर महंमद हुसेन बागवान (सर्व रा.माळीवाडा पंचपीर चावडी ता.जिल्हा अहमदनगर) या सातजणांनी वरील फिर्यादी महिलेस तीच्या माहेरुन घरबांधण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच फळ पिकविण्याचा नवीन एसी खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपये आणावे.

असे म्हणून तसेच तू येथे राहायचे नाही व हे घर सोडून दे असे म्हणून फिर्यादी महिलेस दम देऊन हाता बुक्क्यांनी व प्लॅस्टिकच्या खुर्चीने डोक्यात मारहाण केली व माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये,

नाही तर येथे राहू नको हे घर सोडून दे तसेच तुझ्या नावावर असलेली जागा आमच्या नावावर कर. असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली. तसेच सासरकडील लोकांनी फिर्यादीस शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करून व पैशाची मागणी करून घराबाहेर हाकलून दिले.

अशी फीर्याद पिडीत महीलेने जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली. यावरून सासरकडील पती व सासु सासऱ्यांसह एकुण सात जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शिवाजी भोस हे करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News