मंगलकार्यालय चालक आर्थिक संकटात; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- शहरातील मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावसाय बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांची कर्जामुळे मंगल कार्यालय मालक हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.

कोविडचे संकट दूर होत असताना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालय, हॉल चालक यांच्यावर शासनाचे नियम व अटी लागू करण्यात आलेल्या आहेत.

मंगल कार्यालय असोसिएशनचे सर्व सदस्य शासनाचे सर्व नियम पालन करुन ५० ऐवजी २०० लोकांना कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी.

अशी मगाणी अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे या कार्यक्रमांवर अवलंबून असणारे अनेक कुटूंबिय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता पुन्हा काही दिवस ही परिस्थिती राहिली तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल,

त्याचबरोबर मालकांवरही कर्जाचा बोजा आर्थिक संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही. भगवान फुलसौंदर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

हे मान्य असले तरी नियमांचे पालन करुन अनेक व्यवसाय सुरु आहेत. त्याच धर्तीवर मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांना २०० लोकांची परवानगी मिळावी.

कोणत्याही धार्मिक, लग्न, कौटूंबिक कार्यक्रमासाठी घरातीलच १०० लोक असतात. जवळचे नातेवाईक त्याच बरोबर सजावटकार,

आचारी, केटरर्स, फोटोग्राफर, बॅण्ड-स्पिकर, भटजी आदींचा विचार केल्यास ही संख्या किमान २०० पर्यंत जाते. त्यामुळे या परवानगीची मागणी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe