इंधनच्या करात कपात करण्याची ‘एमआयएम’ ची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- इंधन दरवाढीबाबत केंद्र व राज्य सरकारने कपात करावी, या मागणीचे निवेदन एमआयएम च्यावतीने जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा महासचिव हाजी जावेद, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, नगरसेवक आसिफ सुलतान, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी, युवा शहर अध्यक्ष अमीर खान, मोहम्मद शेख, शौकत पिंजारी, तौसीफ इनामदार, इम्रान शेख, ऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख,

आरिफ सय्यद, समीर बेग आदीं उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सध्या जसे जीवन जगण्यासाठी किराणा व भाजीपाला गरजेचे आहे, तसेच सध्याच्या काळात पेट्रोल व डीझेल हे सामान्य जनतेची गरज बनली आहे.

पेट्रोल व डिझेलच्या भावाने सध्या शतक केले असल्याने सामान्य जनतेचे आर्थिक व्यवस्था खूप बिकट झाली आहे. एकीकडे कोरोना महामारी आणी दुसरीकडे इंधन दरवाढ यामुळे प्रत्यक वस्तू महाग झाली आहे. सदर दर वाढी केंद्र व राज्य शासनाने विचारात घेतले तर कमी होऊ शकत.

केंद्र व राज्य शासनाने एकमताने ठरवले तर दर एका दिवसात कमी होऊ शकतात. त्याचे मूळ कारण केंद्र शासन पेट्रोल मागे 33 प्रती लिटर तर डिझेल मागे 32 प्रती लिटर कर आकारते त्याच प्रमाणे राज्य शासन पेट्रोल मागे 22 टक्के तर डिझेल मागे 22 टक्के कर आकारते.

केंद्र व राज्य सरकारने जर 25 टक्के करात कपात केले तर सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल. सध्या सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खूप खालावली आहे. कोरोना महामारी चालू असतांना केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल दर वाढीचे निर्णय घेऊन सामान्य जनतेला आर्थिक संकटात टाकले आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकारने एकमताने निर्णय घेतले व पेट्रोल व डीझेल चे कर 25 टक्केने कमी केले तर सामान्य जनतेला थोडातरी दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

असे निवेदनाचे पत्र एमआयएम प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या आदेशाने महाराष्ट्रात स्थानिक अधिकार्‍यांमार्फत केंद्रीय सचिव, पेट्रोलियम विभाग न्यू दिल्ली व सचिव विक्रीकर विभाग,महाराष्ट्र यांना देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe