अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोल्हापूर जिल्ह्यात एकाही जागेवर उभे राहण्याची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची लायकी नाही, त्यामुळेच कोल्हापूर सोडून ते पुण्याला गेले.
तो अतिशय भित्रा माणूस आहे. भाजप सरकारच्या गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल मंत्री बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा दर्जा असे दोन नंबरचे स्थान मिळालं.
कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही,
अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कागलमध्ये वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी मुश्रीफ यांना विचारले की,
नवीनकुमार जिंदल यांच्या वक्तव्यावरून भाजपने माफी मागण्याची मागणी तुम्ही केल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात की,
हसन मुश्रीफ यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, आम्ही माफी मागणार नाही. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,
शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या आजारपणाचा संबंध भाजपच्या मीडिया सेलचा प्रमुख नविनकुमार जिंदाल याने वाझे प्रकरणाशी जोडला होता.
त्यामुळे भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती. यामध्ये मी काय चुकीचं बोललो होतो? असा सवालही मुश्रीफ यांनी केला.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा आहे की नाही. देवेंद्र फडणवीस असो की चंद्रकांत पाटील असोत,
सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, काहीही आरोप करु देत, म
हाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालणार आहे. अशा घटनाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मंत्री मुश्रीफ यांनी दिला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|