अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या डाळिंब फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या नुकसानग्रस्त शेतकर्यांना फळपीक विम्याची रक्कम संबंधित विमा कंपन्यांकडून मिळवून देण्याचे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे.
राज्यमंत्री तनपुरे यानू नुकताच पाथर्डी तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मंत्री तनपुरे यांच्यासमोर व्यक्त केल्या.
दरम्यान जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक डाळिंब उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकर्यांनी फळपीक विमा देखील उतरवला होता.
मात्र, जवळपास वर्ष उलटत आले असून संबंधित विमा कंपन्यांकडून शेतकर्यांना विम्याची रक्कम देण्यात आलेली नाही. इतर जिल्ह्यातील शेतकर्यांना डाळिंब फळ पीक विम्याची रक्कम देण्यात आलेली आहे.
परंतु जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना या विम्याचा लाभ व्हावा, अशी मागणी शेतकर्यांनी राज्य मंत्री तनपुरे यांच्याकडे केली.
यावेळी मंत्री तनपुरे यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी फोनवरून चर्चा करून 30 जूनपर्यंत डाळिंब फळ पीक विमा धारक शेतकर्यांना विम्याचे पैसे देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम