अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला अधिक सतर्क करण्यासाठी शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी कॉलेज येथे आढावा बैठक घेऊन प्रादुर्भाव, लसीकरण व उपाय योजनांचा आढावा घेतला.
या बैठकीतून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.लग्न समारंभ पोलिसांच्या परवानगी शिवाय होणार नाहीत.
शहरात २६ ठिकाणी खासगी कोरोना सेंटर सुरू करण्यात आले. एकूण ७५० रुग्ण संख्येची क्षमता या सेंटरची आहे. अतिदक्षता विभागात ८ बेडची व्यवस्था करण्यात आली.
रुग्णांची होम क्वारंटाइन व्यवस्था नीट आहे की नाही, याची पाहणी करण्याच्या सूचना मंत्री थोरातांनी यावेळी दिल्या.
नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे,
मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक मुकुंद देशमुख, सुनील पाटील आदींसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|