अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यातून रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
ज्यात अकोले ते संगमनेर कोल्हार-घोटी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले,
अगस्ती कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा घडवून आणून हे काम लवकर पूर्ण करण्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहावर अकोले तालुका काँग्रेस कार्यकारिणी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत नवले व पांडे यांनी ही माहिती दिली. यावेळी मधुकर नवले, उत्कर्षा रुपवते, मीनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, भाऊसाहेब नाईकवाडी, शिवाजी नेहे, आरिफ तांबोळी, बाळासाहेब नाईकवाडी, डॉ. दामोदर सहाणे यांची भाषणे झाली.
मंदाबाई नवले, मदन पथवे, शंकर वाळुंज, संपत कानवडे, रमेश जगताप, भास्कर दराडे, रमेश पवार, चंद्रमोहन निरगुडे, शोभा निरगुडे, रमेश बोडके, उबेद शेख, अनिल शेटे, कैलास वाकचौरे, भास्कर मंडलिक यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|