रिमांड होममधून अल्पवयीन मुलास पळविले!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- येथील रिमांड होम बालगृहातील एका अल्पवयीन(वय११वर्षे) मुलास अज्ञाताने पळवून नेले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील रिमांड होम बालगृहात असलेल्या मुलांना जेवणासाठी सोडले होते.

नंतर मुले हे जेवण करून झाल्यानंतर हात धुण्यासाठी नळावर गेले असता किरण गोविंदा रेड्डी (वय ११वर्ष,रा. शिमोगाए, जिल्हा चीपमंगरूळ) या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून पळवून नेले आहे.

याबाबत कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून हरवलेल्या मुलाचा रंग-गोरा, चेहरा गोल, बांधा सडपातळ, अंगावर राखाडी कलरचा शर्ट व खाकी कलरची शाळेची पॅंट आहे.

सदरच्या बालकाबाबतीत काही माहिती मिळाल्यास कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe