खून केला फरार ही झाला पण गर्लफ्रेंड मुळे अडकला ! वाचा जिल्ह्यातील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपीची एक चूक…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या झाल्यानंतर त्यातील एक आरोपी फरार झाला आणि थेट उत्तरप्रदेशमध्ये दाखल झाला.

तेथे वेषांतर करून शेतमजूर म्हणून काम करू लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा ठावठिकाणा शोधला. मात्र तोंडाला मास्क आणि वेषांतरमुळे एकवेळ पोलिसांनाही तो ओळखू येईना.

त्याच्या उजव्या हातावर मात्र ‘सायली’ हे नाव गोंदलेले पोलिसांनी हेरले आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय कुलथे याला अखेर जेरबंद केले.

आपल्या प्रेयसीचे नाव गोंदने त्याला इतके महागात पडले कि त्याला दुसर्या राज्यात फरार होऊनही अहमदनगर च्या पोलिसांनी पकडले आणि एक चूक सर्व प्रयत्नांवर भारी ठरली.

श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे 6 एप्रिल रोजी आरोपींनी अपहरण करून त्यांचा खून केला.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी व तोफिक मुक्तार शेख यांना अटक केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

त्यानंतर मिटके यांच्या पथकाने या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याला जेरबंद केले.

या गुन्ह्यातील चौथा आरोपी अक्षय कुलथे मात्र फरार होता. कुलथे हा उत्तरप्रदेशमधील चटिया (ता. बिनंदनकी जि.फत्तेपूर) येथे असल्याची माहिती उपाधिक्षक मिटके यांना समजली होती.

त्यानंतर पथकाने चटिया या खेडेगावात कुलथे याचा शोध घेतला. त्याच्या उजव्या हातात प्रेयसीचे नाव गोंदलेले आहे ही बाब पोलिसांना माहिती होती. हिच ओळख पटवून पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe