अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- परिषद किंवा १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून दोन तीन लाख रुपयांची कामे मंजूर करून आणायची, लाख रुपयांच्या विकास कामाच्या नावाखाली हातभर भाषणे ठोकायची, हे काम विरोधक करत आहेत,
त्यामुळे विकासाच्या नावाखाली मोठमोठी भाषणे ठोकणारांची संख्या तालुक्यात वाढली असून, भाषणे ठोकण्यापेक्षा आपला विकास कामांवर भर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी केले.
राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांच्या हस्ते तराळवाडी बुगेवाडी सोबलेवाडी महाजन मळा या ठिकाणी १ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या विकास कामाचा लोकार्पण व शुभारंभ करण्यात आला, या वेळी ते बोलत होते .या कामांमध्ये तराळवाडी ते लोणी मोरीपूल १२.४५, महाजन मळा मोरीपूल ९.८५ तर सोबलेवाडी ते बुगेवाडी रस्ता ३७ लाख, बुगेवाडी ते सोंडवस्ती दरा २७ लक्ष,
बुगेवाडी स्मशानभूमी १७ लाख ५० हजार, बुगेवाडी श्रीराम मंदिर शौचालय ७ लक्ष, दोन हायमॅक्स, या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा करण्यात आला. पारनेर नगरपंचायतच्या नगरसेविका विजेता सोबले यांच्या प्रयत्नाने ही विकासकामे होत आहेत. या वेळी विलास सोबले, उद्योजक विजय औटी, राजेश चेडे, आनंदा औटी, डॉ. मुदस्सर सय्यद,
दत्तात्रय कुलट, उद्योजक सहदेव तराळ, दिनेश औटी, साहेबराव देशमाने, विलास तराळ, बाळासाहेब नगरे, सुभाष शिंदे, संदीप थोरात, कोंडिभाऊ थोरात, सोपान बुगे, दगडू कावरे, संदीप काळे, संपत वारे, सुप्रिया शिंदे, कल्पनाताई औटी, मंगल वारे, सुवर्णा बुगे, शारदा थोरात, अर्चना शिंदे, सुनीता कावरे, भाऊसाहेब कावरे, कैलास चत्तर, रामदास थोरात यांच्यासह ग्रामस्थ्थ उपस्थित होते.
या वेळी आ. लंके म्हणाले, शहरासह मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असून, शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, पाणी यांच्यासह मूलभूत सोयीसुविधा सोडवण्यासाठी भर दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असल्याचे आ. लंके या वेळी म्हणाले.
कोण काय करतं, यापेक्षा विकासकामांसाठी किती निधी आणता येईल, यावर आपला भर असून, जनतेचा सेवक म्हणून आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम