अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. मतदार संघातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष नसल्याने यापूर्वीही आमदार राजळे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आली आहे.
दरम्यान शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावात आमदार राजळे यांनी यांनी पहिल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या टर्ममध्ये एकही विकासकाम केले नाही. दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही आतापर्यंतच्या दोन वर्षात एकही विकासकाम केलेले नाही, असा आरोप भावीनिमगावचे (ता. शेवगाव) सरपंच आबासाहेब काळे यांनी केला आहे.
याबाबत सरपंच काळे म्हणाले, भावीनिमगावातील अनेक प्रलंबित कामांसाठी ग्रामस्थांनी आमदार राजळेंकडे वारंवार मागणी केली. आमची ग्रामपंचायत जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीची असली तरी जी कामे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होऊ शकत नाहीत, अशा कोणत्याही कामात ग्रामपंचायतीच्या वतीने आडकाठी निर्माण केली गेली नाही.
मात्र तरीही राजळेंनी विकासकामे दिली नाहीत. असे असताना त्या तालुक्यात प्रचंड विकासकामे केल्याची बतावणी करत आहेत. मात्र भावीनिमगावसारखी अनेक गावे असतील जिथे राजळेंनी दमडीचेही विकासकाम केलेले नाही. दरम्यान आमदार राजळे यांचा शेवगाव तालुक्यातील विकासकामांकडे लक्षच नसल्याची जनभावना अनेकदा समोर आली आहे.
तसेच शेवगावमधील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या देखील अनेक प्रलंबित समस्यांविषयी आमदार राजळेंच्या निवास्थानी आंदोलन करण्यात आले आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी मतदान पुरते तालुक्यांकडे लक्ष दिले आणि विजयी होताच तालुक्याच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम