अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-आज देशात पाच राज्याच्या निवडणुका झाल्या यामध्ये देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालावर लागून होते.
यातच ममता बॅनर्जी आणि भाजपामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी रथी महारथींना मात देत निवडणुकीत विजय मिळविला आहे.
त्यांच्या याच विजयावरून ममता यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ममता बॅनर्जी यांच्या विजयावर खास प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘समोर कितीही बलाढ्य शक्ती असली, तरी त्यांच्याशी लोकांच्या साथीने त्याच आक्रमकपणे लढा दिल्यास त्यांनाही पराभूत करता येतं,
याचं उदाहरण देशातील सर्वच पक्षांसाठी ममता बॅनर्जी दीदींनी दाखवून दिलं.या विराट विजयाबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचं आणि ममता दिदींचं मनःपूर्वक अभिनंदन !’.
यापूर्वीच पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ममता यांचं अभिनंदन केलं आहे.
सध्या तृणमूल काँग्रेस 212 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या 78 जागांवर आघाडीवर आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|