अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असताना देशात दिवसाला चार लाख कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या.
तसेच विविध कार्यक्रमात ठीक ठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या बाबतच्या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या, तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले.
देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे. असे असताना केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला ५ तर वर्षाला ६० कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे.
लसीचा तुटवडा पाहता केंद्र व राज्य सरकारांनी समन्वय साधून सदर कंपनी सुरु करावी,असे आ.पवार म्हणाले आहेत. दरम्यान तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या फक्त गुजरात राज्यासाठी पंतप्रधानांनी मदत जाहीर केली,
मात्र चक्रीवादळाने नुकसान झालेल्या महाराष्ट्रासह इतर दोन राज्यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत करावी, याबाबत आम्ही आशावादी असल्याचे आ.रोहित पवार यांनी सांगितले.लसीचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने तामिळनाडूतील बंद असलेली लस निर्मिती कंपनी सुरू करावी,
अशी मागणी ही आ.पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल.
महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळाली पाहिजे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम