आमदार रोहित पवार म्हणतात ; ‘ही’ तर भाजप नेत्यांची जुनी सवय!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- ‘खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. मात्र दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत धडधडीत खोटे बोलणे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.’

असा जोरदार हल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातीळ तील १२ रुपये राज्यांना मिळतात त्यामुळे राज्य सरकारने आधी स्वत:कडे बघण्याची आवश्यकता आहे,’ असे फडणवीस काल पुण्यातील पुण्यात म्हणाले होते.

या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी ट्विटवरद्वारे भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.  ते म्हणतात  ‘केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात?

तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रु मिळत असल्याचे सांगतात.’

‘विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही असा जोरदार हल्ला रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe