अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी वादाचे केंद्रबिंदू बनत असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या बोलण्यातून वादाला जागा दिली आहे.
नुकतेच त्यांनी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर घणाघात केला आहे. घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, श्रीगोंदा कर्जत चा हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेल्या रोहित पवार हे कामामध्ये कधीकधी आणि श्रेया मध्ये सर्वात आधी असल्याचं म्हटलं आहे. आपणच मुख्यमंत्री असल्यासारखं रोहित पवार केंद्र सरकार वर बोलतात.
मात्र आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही. बारामती ॲग्रो च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्याच्या खाद्यांने मोठे नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणाने आपल्याकडे केली
असल्याचे सांगत रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित वर्जन असून गेल्या पाच पिढ्याची शरद पवारांनी माती केली आहे.
आता पुढच्या पाच पिढ्याची रोहित पवारांमुळे माती होईल असं पडळकर म्हणाले आहे रोहित पवार हे स्वयंघोषित मुख्यमंत्र्यासारखे बोलतात, येत्या काळात त्यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून पळून
जावं लागेल, अशी घणाघात टीका आमदार .गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.आता पडळकर यांच्या या टीकेला आमदार रोहित पवार कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम