अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील सर्जेराव मच्छिंद्र माळी या ३३ वर्षीय तरुणाने २२ स्कोअर असतानाही सहा दिवसांत कोरोनावर मात केली.
मुळानगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांचे भाचे सर्जेराव मच्छिंद्र माळी याने १४ मे रोजी नगर येथे अँटीजेन तपासणी करून घेतली.
त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह निघाला. अर्जुन यांनी माजी सरपंच अंकुश बर्डे यांना व्यथा सांगितली. बर्डे यांनी नेवासे फाटा येथे एचआरसीटी करण्याचे सांगितले.
तपासणीत अर्जुनचा स्कोर २२ आला. उपचारादरम्यान खासदार सुजय विखे यांनी अर्जुनला रेमडेसिवीरचे २ इंजेक्शन उपलब्ध करून देत मानसिक आधार दिला. त्यामुळे तो कोरोनातून सहा दिवसांत बरा झाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम