नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- ऊठसुठ काहीही आराेप करणारे पटाेले हे ‘महाराष्ट्राचा पप्पू’ आहेत. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सहकार मंत्रालय सुरू करण्याच्या विषयावर व्यक्त केलेल्या मतावर टीका करताना

राऊत यांना सहकार क्षेत्रामधील काय कळते ? असा खाेचक प्रश्न करत त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील प्रश्नासंदर्भात पाटील यांनी या भागातील लाेकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते पत्रकार परीषदेत बाेलत हाेते.

या महापाैर मुरलीधर माेहाेळ, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष याेगेश टिळेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर यावेळी उपस्थित हाेते.

साखर कारखाना विक्रीसंदर्भातील पत्राचा उल्लेख करताना, पाटील यांनी जरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहार हे हिमनगाचे टोक असल्याचा पुनर्रुच्चार केला. मी जे पत्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिले आहे.

त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 वर्षांपूर्वीच दिलेल्या यादीचाही समावेश आहे. यादीत गडकरी यांच्या दाेन साखर कारखान्यांचा उल्लेख असला तरी त्या कारखान्यात काेणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा करीत पाटील यांनी गडकरी यांना क्लिन चीट दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe