नवाझुद्दीन विवाहित होता मात्र त्यानं ही गोष्ट माझ्यापासून लपवली होती…

Ahmednagarlive24
Published:

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यावर माजी मिस इंडिया आणि नवाझची एक्स गर्लफ्रेंड निहारिका सिंहनं त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. विवाहित असतानाही नवाझुद्दीन निहारिकासोबत रिलेशिनशिपमध्ये होता.

असे म्हटले होते. नवाझुद्दीनची पत्नी आलियानं त्याला लॉकडाऊनमध्ये घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवरही खळबळजनक आरोप केले होते.

नवाझुद्दीन सिद्दीकी आणि निहारिकाची ओळख मिस लवली या सिनेमाच्या सेटवर झाली होती. निहारिकानं एका मुलाखतीत सांगितलं की जेव्हा ते दोघं एकमेकांना डेट करत होते.

त्यावेळी नवाझुद्दीन विवाहित होता मात्र त्यानं ही गोष्ट माझ्यापासून लपवली होती असे तिने म्हटले आहे. Me Too अभियाना अंतर्गत निहारिकानं नवाझुद्दीन सिद्दीकीवर अनेक गंभीर आरोप केले होते.

तिनं सांगितलं, जेव्हा एकदा सकाळी मी माझ्या घरी होते. तो रात्रभर शूटिंग पूर्ण करून परतला होता. त्याचं शूटिंग माझ्या घराच्या आसपासच होतं.

त्यामुळे मी त्याला नाश्त्यासाठी बोलावलं होतं. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा त्यानं मला मागून मिठी मारली. मी त्याला धक्का देत दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यानं मला सोडलं नाही. असा आरोपही तिने केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment