हलगर्जीपणा…वेळेत उपचार न मिळाल्याने काळवीटाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील तळणी शिवारातील एका वस्तीवर काळवीट जातीचे हरण जखमी अवस्थेत फिरताना अनेकांनी पाहिले होते. यावेळी काहींनी याबाबतची माहिती तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवली.

पाच मिनिटांत तिथे पोहोचतो असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र संबंधित कर्मचारी उशिराने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्या काळविटाला ताब्यात घेतले.

दुसऱ्या दिवशी त्या काळविटाचा मृत्यू झाल्याचे समजले. शेवगाव तालुक्यातील तळणी शिवारात हे जखमी काळवीट फिरत होते. गावकर्यांनी याबाबत वनविभागाला कळवल्यानंतर त्यांनी कळविटाला ताब्यात घेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते काळवीट घेऊन

त्याच गावाच्या जवळील एका गो शाळेच्या गोठ्यात आणून ठेवले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याने त्याचे शवविच्छेदन करून पुरल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी गोशाळेत काळवीट का ठेवले, जखमी काळविटाला तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना का दाखविले नाही. याबाबतचा काळविटाचा मृत्यू अहवाल कार्यालयास सादर करून नोंद घेण्यात आली आहे का.? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe