नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला….गाडी दरीत कोसळण्यापूर्वीच थांबणार, वाचा सविस्तर

Sonali Shelar
Updated:
Nitin Gadkari

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल राज्यसभेत हायवेवरील ट्रक, बस आणि कारच्या अपघातांवर एका नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे . यावेळी नितीन गडकरी यांनी राज्यसभेत महामार्गावरील ट्रक आणि वाहनांना संरक्षण देण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठीची एक खास योजना मांडली आहे.

राज्यसभेतील स्वीकृत सदस्य गुलाम अली यांच्याकडून नितीन गडकरींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. ते म्हणाले की, केंद्र सरकार काश्मीरमध्ये खूप काम करत आहे, मात्र असे असूनही रस्त्यांवरील अपघात कमी होत नाहीत. अनेकदा ट्रकचा अपघात इतका भीषण असतो की, रस्त्यांवर क्रॅश बॅरिअर असूनही ट्र्क थांबत नाही, ते सरळ खाली कोसळतात. यावरच नितीन गडकरींनी एक उत्तम कल्पना सुचवली आहे. काय म्हणाले नितीन गडकरी वाचा सविस्तर…

काय म्हणाले नितीन गडकरी?

या प्रश्नाचे उत्तर देत नितीन गडकरी म्हणाले, “डोंगराळ भागात अपघातांचे प्रमाण जास्त आहे, हे अगदी खरे आहे. पूर्वी लोखंडी क्रॅश बॅरिअर होते ज्यामुळे मोठे अपघात टाळता येत नव्हते, पण आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉंक्रिटमध्ये एम्बेड केले जाते. यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही, तर तो मागे येतो.

या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे. उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, अरुणाचल प्रदेश यांसारख्या अवघड डोंगराळ भागात असे अपघात होतात. असे अपघात कसे कमी करता येतील याचा प्रयत्न करू. या तंत्रज्ञानाचा प्रयोग आम्ही काही ठिकाणी केला आहे.

यादरम्यान, नितीन गडकरी यांनी बांबू इको फ्रेंडली क्रॅश बॅरिअरचा देखील उल्लेख केला. आजकाल आसाममध्ये पर्यावरणपूरक बांबू क्रॅश बॅरिअर बनवले जात आहेत, ज्यामुळे आदिवासींना काम मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe