विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये, अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार

यांनी भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांना लगावली आहे. खा. विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिवीरचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता.

या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. खा. विखेंच्या कृतीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी ही टिपण्णी केली. अजितदादा म्हणाले, लोकप्रतिनिधींनी सगळ्या गोष्टींची शहानिशा करुनच आपलं काम केलं पाहिजे, उ

दाहरण सुजय विखेंचं असले तरी सर्वच पक्षातील लोकप्रतिनीधींनी या महामारीच्या संकटात सामंजस्य भूमिका घ्यायला हवी. असे ते म्हणाले. द

रम्यान, सुजय विखे पाटील यांनी परदेशातून आणलेली औषधे किंवा इंजेक्शने सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता.

सलग आठ दिवस रुग्ण संख्या साडेतीन हजारांच्या पुढे होती. मात्र, दोन दिवसांपासून रुग्ण संख्येचा आलेख उतरता आहे, असे असले तरी काही दिवसांपूर्वी रेमडेसिविर इंजेक्‍शनचा नगरमध्ये काळाबाजार होत असल्याच्या चर्चा होत्या.

भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने चा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. फेसबुकवर शेअर केलेल्या

या व्हिडियोवरून सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. ठाकरे सरकारमधील नेते या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|