अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. यामुळे नगरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
यातच जिल्ह्यातील अनेक गावे कोरोनमुक्त झाली आहे तर काहींची पाऊले त्यादृष्टीने पडत आहे. यातच नगर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.

नगर तालुक्यातील जेऊर गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा फायदा गावाला कोरोनामुक्तीकडे वाटचाल करण्यास झाल्याचे चित्र गावात दिसून येत आहे.
सक्रिय रुग्णसंख्या केवळ ६ उरली आहे. गावात तीन महिन्यात ६८७ रुग्ण आढळले होते. त्यात २८ जणांचा बळी गेला. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते.
सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावात कोरोनाकाळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्याचा परिणाम गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.
कोरोना ग्रामस्तरीय समितीच्या वतीने गावात सुमारे एक महिना जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. गावात वाड्यावस्त्यांवर जंतनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. गावात विलगीकरण कक्ष व कोविड सेंटर सुरू करून टेस्ट, ट्रेसिंग करण्यात आल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम